BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
पुरानं उद्ध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुनर्निर्माणासाठी किती खर्च होऊ शकतो? 'हे' देश मदतीसाठी धावले
जागतिक बँकेने 167 दशलक्ष डॉलर्सच्या सवलतीच्या कर्जाचे, तर आशियाई विकास बँकेने (एडीबी) 5 दशलक्ष डॉलर्सचं अनुदान आणि अतिरिक्त तांत्रिक सहाय्य देण्याचं वचन दिलं आहे.
व्हीडिओ, 'आम्हीही जीव वाचवू शकतो', कोल्हापुरातील ट्रान्सजेंडर पथक - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 5,35
कोल्हापुरात 15 ट्रान्सजेंडर व्यक्ती आता आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेत आहेत. पूरस्थितीत बचावकार्य, शोध आणि सुटका, प्रथमोपचार, बेसिक लाईफ सपोर्ट, गर्दी व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थापनाचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातंय.
'पाण्यावर तरंगणारं' बेट अचानक गायब झालं, मग 30 किमी दूर सापडलं; रहस्य काय?
कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील एका अथांग सरोवरात पाण्यावर तरंगणारं एक गूढ बेट पुन्हा एकदा नजरेस पडलं आहे.
'UPSC क्रॅक करूनही पद मिळालं नाही'; OBC क्रिमीलेयरचा 33 वर्षांपासूनचा घोळ नक्की काय आहे?
गेल्या दहा वर्षांपासून सतेज माळी यांच्यासारखे जवळपास 100 ओबीसी उमेदवार न्यायालयीन लढा देत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूनं निकाल दिला असला तरीही केंद्र सरकारने त्याच्या अमंलबजावणी संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत.
शस्त्रक्रियेसाठी 13 वर्षांची प्रतीक्षा आणि एम्स येथे मृत्यू, तन्वीच्या कुटुंबाने कोणते आरोप केले?
15 वर्षांच्या तन्वीचा दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) मृत्यू झाला. तिच्या हृदयात छिद्र होते. तिच्या आई-वडिलांचा आरोप आहे की AIIMS ने 13 वर्षांतही त्यांच्या मुलीचे ऑपरेशन केले नाही. त्यांना सतत तारखा दिल्या गेल्या.
दिल्ली दुर्घटनेतील मृतांचा आकडा 7 वर; इमारत मालकाला अटक, कारवाईबाबत मुख्यमंत्री काय म्हणाल्या?
दिल्लीतील सत्य निकेतनमध्ये रविवारी दुपारी पाच मजली पीजी इमारत कोसळून झालेल्या अपघातानंतर मृतांचा आकडा सातवर पोहोचला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे चित्र असलेले एक डॉलरचे नाणे; लाँचिंगच्या काही तासानंतरच 'आउट ऑफ स्टॉक'
डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा असलेले एक डॉलरचे नाणे अमेरिकेनी जारी केले आहे. अमेरिकन संस्थांवर आपला प्रभाव टाकण्यासाठीचा हा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे.
तोंडातील चांगले बॅक्टेरिया तुमच्या आरोग्यासाठी का महत्त्वाचे? त्यांना निरोगी ठेवण्यासाठी काय खाल?
आपल्या तोंडात अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात आणि प्रत्येकाचा तोंडात राहण्याचा म्हणजे निवासस्थानाचा एक ठराविक भाग असतो. काही बॅक्टेरिया दातांच्या पृष्ठभागावर राहतात, तर काही जिभेवर असतात. काही बॅक्टेरिया दात आणि हिरड्यांमधील छोट्या जागांमध्येही दडून बसतात.
जे प्रकल्प एकेकाळी नेपाळसाठी वरदान मानले जात होते, तेच आता धोक्यात का आहेत?
नेपाळची जवळपास 100 टक्के वीज जलविद्युत प्रकल्पांमधून मिळते. ही वीज निर्मिती क्षमता इतकी प्रचंड आहे की, नेपाळ भारत आणि बांगलादेशला वीज विकून दरवर्षी अंदाजे 200 दशलक्ष डॉलर्स कमावतो.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, धाराशिवसह 'हे' जिल्हे कोरडेच, पावसाचा अलर्ट कुठे कुठे?, वेळ 4,57
राज्याच्या अंतर्गत भागांना लाभ होऊ शकतो, असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलंय. पुढचे काही दिवस कसं असेल हवामान? जाणून घ्या
व्हीडिओ, नेपाळसारखा महापूर भारतातही येऊ शकतो का? भारताने काय तयारी करावी?, वेळ 5,56
हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या दोन्ही देशांतून वाहतात. मग नेपाळच्या या महापुरातून भारताने काय धडा घ्यावा? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये
व्हीडिओ, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका डॉ. कविता गित्ते यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांचा कोयता कसा सोडवला?, वेळ 4,01
बीडच्या केजमधील साने गुरुजी निवासी विद्यालयाची जबाबदारी कविता गित्तेंवर आहे. त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
व्हीडिओ, भाषेतली श्लील-अश्लीलता कोण ठरवतं? तुमच्या मनातील समज-गैरसमजाची उत्तरं डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्याकडून, वेळ 1,09,54
भाषेतली श्लीलता आणि अश्लीलता नेमकी कोण ठरवतं? ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार भाषा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक संदर्भातून या प्रश्नाचा वेध घेतात.
व्हीडिओ, भारतीय संविधानाने मनुस्मृतीचा पराभव कसा केला? - यशवंत मनोहर यांची मुलाखत , वेळ 44,02
या विशेष मुलाखतीच्या मालिकेत महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे भारतीय समाज व संविधानातील महत्त्व यशवंत मनोहर यांनी स्पष्ट केलंय.
व्हीडिओ, नेपाळमध्ये शवागार पडले कमी; सरकारी कार्यालयात ठेवले मृतदेह, वेळ 6,06
नदीतून वाहून आलेल्या जवळपास 300 मृतदेहांमुळे हा जिल्हा मोठ्या संकटात सापडला आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.




































































